दुधाचा टँकर दोन दुचाकीच्या अपघातात तीन युवक ठार, एक जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 23:24 IST2023-03-17T23:23:47+5:302023-03-17T23:24:16+5:30

हा अपघात शुक्रवारी ( दि.१७) रात्री साडे आठच्या सुमारास तालुक्यातील संगमनेर-अकोले रस्त्यावर मंगळापुर शिवारात बर्फ कारखान्यापासून काही अंतर पुढे घडला. 

Three youths killed, one seriously injured in milk tanker-two-wheeler accident | दुधाचा टँकर दोन दुचाकीच्या अपघातात तीन युवक ठार, एक जण गंभीर जखमी 

दुधाचा टँकर दोन दुचाकीच्या अपघातात तीन युवक ठार, एक जण गंभीर जखमी 

संगमनेर : दुधाचा टँकर आणि दोन दुचाकी वाहने यांचा अपघात होऊन दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला. तर एका तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी ( दि.१७) रात्री साडे आठच्या सुमारास तालुक्यातील संगमनेर-अकोले रस्त्यावर मंगळापुर शिवारात बर्फ कारखान्यापासून काही अंतर पुढे घडला. 
     
ऋषिकेश उमाजी हासे ( वय २०), निलेश बाळासाहेब सिनारे ( वय २६), सुयोग बाळासाहेब हासे ( वय २०) अशी या अपघातातील तिघा मयतांची तर संदीप भाऊसाहेब केरे ( वय ३२) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुधाचे संकलन करून अकोलेकडून टँकर येत होता. त्यावेळी दोन दुचाकीहून चार जण अकोलेच्या दिशेने जात होते. यावेळी या तीन वाहनांचा अपघात झाला. 

अपघाताची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस नाईक विजय खाडे, निलेश धादवड, विजय पवार हे तात्काळ अपघातस्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. केरे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्याच्या वसाहतीमध्ये उभी केली.

Web Title: Three youths killed, one seriously injured in milk tanker-two-wheeler accident