चारचाकी वाहनाच्या शोरूममधून तीन लाख चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:03 IST2021-02-17T13:02:25+5:302021-02-17T13:03:07+5:30
चारचाकी वाहन शोरूममधील रोखपाल कक्षातून अज्ञात चोरट्याने ३ लाख १३ हजार ८१२ रूपये चोरून नेले. ही घटना १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील शिरोडे होंडाई या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये घडली.

चारचाकी वाहनाच्या शोरूममधून तीन लाख चोरीला
संगमनेर : चारचाकी वाहन शोरूममधील रोखपाल कक्षातून अज्ञात चोरट्याने ३ लाख १३ हजार ८१२ रूपये चोरून नेले. ही घटना १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील शिरोडे होंडाई या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये घडली.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरोडे होंडाईचे व्यवस्थापक वैभव रामदास येवला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख अधिक तपास करीत आहेत.