जामखेडमध्ये तीन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 16:03 IST2019-10-26T16:03:07+5:302019-10-26T16:03:40+5:30

जामखेड शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. 

Three lakh burglaries in Jamkhed | जामखेडमध्ये तीन लाखांची घरफोडी

जामखेडमध्ये तीन लाखांची घरफोडी

जामखेड : शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. 
जामखेड शहरातील संताजीनगर येथे रहात असलेले आडत व्यापारी रमेश जरे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. २६ आॅक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूकडील असलेला दरवाजाचे सेफ्टी लॉक कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी सामानाची उचकापाचक करून घरातील कपाटात असलेले रोख दोन लाख दहा हजार व साडे सात तोळे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने चोरून नेले. यावेळी चोरट्यांनी आसपासच्या घराला कडी लावली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. 
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकाने अर्धा किलोमीटरपर्यंत मार्ग दाखवला. त्यानंतर ते परत फिरले. जामखेड पोलिसांनी याबाबत फियार्दी रमेश जरे यांच्या तक्रारीवरून चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत. 

Web Title: Three lakh burglaries in Jamkhed