सोलापूर रस्त्यावरील अपघातात तीन व्यावसायिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 11:33 IST2017-12-10T11:30:38+5:302017-12-10T11:33:03+5:30

नगर-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या मालट्रक व कारच्या भीषण अपघातात निंबळक (ता. नगर) येथील तीन व्यावसायिक जागीच ठार झाले

Three businessmen killed in Solapur road crash | सोलापूर रस्त्यावरील अपघातात तीन व्यावसायिक ठार

सोलापूर रस्त्यावरील अपघातात तीन व्यावसायिक ठार

ठळक मुद्देमध्यरात्रीची घटनाकारचा चक्काचूरनिंबळकवर शोककळा

अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या मालट्रक व कारच्या भीषण अपघातात निंबळक (ता. नगर) येथील तीन व्यावसायिक जागीच ठार झाले. या अपघातात कार चक्काचूर झाली असून निंबळक गावावर शोककळा पसरली आहे.
भैरवनाथ गायकवाड (वय ४०), आत्माराम खरमाळे (वय २८)आणि जालिंदर भिल्लारे (वय ३८. सर्व रा. निंबळक, ता. नगर)अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात महेश काळसे हा तरूण जखमी झाला. ट्रकने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. या कारमधील तिघेही जागीत गतप्राण झाले. या दुर्घटनेमुळे निंबळक गावावर शोककळा पसरली आहे. मयत तिघेही या परिसरातील व्यावसायिक होते. दोघांचे हॉटेल, तर एकाचे मोटार वाईडिंगचा व्यवसाय होता.

Web Title: Three businessmen killed in Solapur road crash