बिबट्याचा उस तोडणी मजुरांच्या राहुटीवर हल्ला, तेरा वर्षाचा मुलगा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:17 IST2022-02-28T13:20:31+5:302022-02-28T14:17:34+5:30

Leopard Attack :नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची राहुटी नितीन नलवडे यांच्या शेतात आहे.

Thirteen-year-old boy injured in leopard attack | बिबट्याचा उस तोडणी मजुरांच्या राहुटीवर हल्ला, तेरा वर्षाचा मुलगा जखमी

बिबट्याचा उस तोडणी मजुरांच्या राहुटीवर हल्ला, तेरा वर्षाचा मुलगा जखमी

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील  आनंदवाडी  येथे ऊस तोडणी मजुरांनी थाटलेल्या राहुटीवर बिबट्याने रुद्र ज्ञानेश्वर कांबळे (रा. सिल्लोड) या तेरा मुलावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची राहुटी नितीन नलवडे यांच्या शेतात आहे. रुद्रला नितीन नलवडे यांनी तातडीने काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पण जखम मोठी असल्याने उपचारासाठी नगर येथील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

दरम्यानच्या काळात बिबट्याने शहाजी थोरात यांच्या गायीचे वसरु जखमी केले केले. वनविभागातील अधिकाऱ्यांची टीम सिव्हील रुग्णालयात या मुलांची पाहणी करण्यासाठी गेली आहे.  पण बिबट्याचा हल्ला हा आनंदवाडी परिसरात चिंतेचा विषय बनला आहे. 

Web Title: Thirteen-year-old boy injured in leopard attack