कोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील तळेगाव मळे येथील पुरातन शनी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.३०) मध्यरात्री मंदिरातून उचलून नेली. दानपेटीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र कुलूप न तुटल्याने दानपेटी तेथेच पडून होती. यामुळे दानपेटीतील रोकड सुरक्षित राहिली.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने कोपरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. दानपेटी व दानपेटीतून खाली पडलेली चिल्लर तशीच पडून होती. चोरट्यांचा चोरी करण्याचा उद्देश असता तर त्यांनी कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम नेली असती, परंतु तसा कुठलाच प्रकार घडला नाही. त्यामुळे हा कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
तळेगावमळे येथे चोरट्यांनी शनी मंदिराची दानपेटी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 13:49 IST