शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दाळमंडई फौंडेशन लावणार शहरात दोन हजार झाडे

By admin | Updated: June 16, 2016 23:59 IST

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर या ग्रीन चळवळीचे जिल्हाभरातून स्वागत झाले.

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर या ग्रीन चळवळीचे जिल्हाभरातून स्वागत झाले. नगर येथील दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने नगर शहरातील विविध भागात दोन हजार झाडे लावण्याचा व ते संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी जागाही निवडल्या आहेत. ‘ग्रीन अहमदनगर’ चळवळीत आम्हाला सहभागी व्हायचे आहे, असे असंख्य दूरध्वनी आज ‘लोकमत’ कार्यालयात खणखणले.
शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे धुळीने व्यापलेले शहर अशी नगर शहराची ओळख बनली आहे. यावर मात करीत नगरला ‘ग्रीन सिटी’चा दर्जा मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने लोकसहभागातून ‘माय सिटी-माय ट्री’ हे अभियान हाती घेतले आहे. याच अभियानांतर्गत नागरिकांना झाडे लावण्याचे व ते जगविण्याचे आवाहन ‘लोकमत’ने गुरुवारी केले. या अभियानाचे शहरासह जिल्ह्यातूनही स्वागत झाले. व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप, फेसबुकवरही या उपक्रमाचे स्वागत झाले.
‘ग्रीन अहमदनगर’साठी दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला आहे. फौंडेशनचे अध्यक्ष संजय ताथेड, उपाध्यक्ष सुधीर मुनोत, सचिव अनिल अनेचा, प्रकल्प संचालक विनोद बोथरा यांनी ‘लोकमत’शी थेट संपर्क करून ‘ग्रीन अहमदनगर’ अभियानात आम्ही सहभागी होणार असल्याचे सांगितले. या अभियानाद्वारे दोन हजार झाडे लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. तसे लेखी पत्रही त्यांनी ‘लोकमत’ला दिले आहे. पहिल्या टप्प्यात ते सातशे झाडे लावणार आहेत. त्याच्या जागा आणि रोपांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच शहरातील शाळांमध्ये झाडे लावण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्यासाठी शाळांनी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी फौंडेशनचे संचालक देवकिसन मणियार, पप्पुशेठ मुंदडा, नितीन चंगेडिया, संतोष पिपाडा, आशिष खंडेलवाल, अमित मुथ्था, सतीश काकाणी, राजू शेटिया, किशोर डागा, प्रशांत मुथ्था, राजेंद्र मुनोत, संजय लुंकड, सूरज कोठारी, बजरंग दरक आदी उपस्थित होते.
या फौंडेशनने यापूर्वी दुष्काळी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या टप्प्यात सातशे झाडे
दाळमंडई फौंडेशनने श्री. रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशन शाळा भवानीनगर येथे ( ५० रोपे), देऊळगाव सिद्धी (२०० रोपे), वडगाव तांदळी (२०० रोपे), नवजीवन कॉलनीतील ओपन स्पेस (७० रोपे), जैन पार्क, पुनममोतीनगर (५० रोपे), नंदनवन कॉलनी, बुरुडगाव रोड( ५० रोपे), कराचीवाला नगर (५० रोपे) अशी एकूण ६७० झाडे पहिल्या टप्प्यात लावण्याची जबाबदारी घेतली आहे. तसा लेखी प्रस्ताव त्यांनी आज ‘लोकमत’कडे सादर केला.
सहभागासाठी संपर्क
ग्रीन अभियानात सहभागी होण्यासाठी लोकमत कार्यालयात ९१७५५७५७५५ या भ्रमणध्वनीवर अथवा ०२४१-२४२९९०२, २४२९७११ या क्रमांकावर संपर्क साधावा. लोकमत कार्यालयात आपण प्रत्यक्ष भेट देऊनही या अभियानात काही जबाबदारी घेऊ शकता.