शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी वृक्षक्रांती आणि वाचनक्रांती झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST

निघोज : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वाचनक्रांती आणि वृक्षक्रांती होणे फार गरजेचे आहे. वाचनक्रांतीतून तरुण पिढी विकसित होणार असून, तीच ...

निघोज : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वाचनक्रांती आणि वृक्षक्रांती होणे फार गरजेचे आहे. वाचनक्रांतीतून तरुण पिढी विकसित होणार असून, तीच खरी उद्याच्या भारत देशाची ताकद असणार आहे. तरुणांनी समोर येऊन विविध समाजोपयोगी कामात सक्रिय राहून एक आदर्शवत काम केले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

चोंभूत (ता. पारनेर) येथे परिवर्तन मियावाकी उद्यान वृक्षारोपणच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. गावाने मियावाकी उद्यान बनविण्याचा संकल्प केला असून, यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा व ग्रामस्थांचा सहभाग आहे. या उद्यानात विविध फळझाडे व जंगली झाडे, अशी ५०० प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, डॉ. भास्कर शिरोळे, पारनेर परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर, शिवबा संघटनेचे अनिल शेटे, भालचंद्र दिवटे, बायफ संस्थेचे एस. पाटील, सुभाष रनमोडे, गणेश शेवाळे, गेनभाऊ माळी, स्वप्नील आंबेटकर, दत्तात्रय कोल्हे, भाऊ मेहेर, विठ्ठल पारखे, खंडू खांडेकर, रामदास पारखे उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण घोलप यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत नरवडे यांनी केले. प्रणल भालेराव यांनी आभार मानले.

----

२३ चोंभूत

चोंभूत येथे वृक्षारोपण करताना पद्मश्री पोपटराव पवार, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व इतर.