शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘स्वाभिमानी’ची नेवाशात बंडखोरी

By admin | Updated: July 30, 2014 00:45 IST

कुकाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी नेवासा विधानसभेची जागा सोडावी, अशी मागणी महायुतीकडे केली आहे.

कुकाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी नेवासा विधानसभेची जागा सोडावी, अशी मागणी महायुतीकडे केली आहे. परंतु तसे न झाल्यास येथे बंडखोरी केली जाईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र भंडारी यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत कोरडे यांनी ही भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नेवासा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी व महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. महायुतीचा आमदार नसलेला मतदार संघ शेतकरी संघटनेस सोडण्यात महायुती तयार आहे. नेवासा तालुका हा क्रांतीकारी मतदारसंघ आहे. परंतु ही जागा न मिळाल्यास बंडखोरी करुन राजेंद्र भंडारी यांना येथून उभे करुन जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या मागे उभी करु. लवकरच कुकाणा येथे खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत मेळावा घेऊन भूमिका जाहीर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. माजी खासदार तुकाराम गडाख, विठ्ठलराव लंघे यांनी सत्ताधाऱ्यांशी हात मिळवून शेतकऱ्यांना विश्वासघात केला. परंतू आपण आयुष्यात कधीच सत्ताधाऱ्यांशी तडजोड केली नाही व आणि करणारही नाही, असे भंडारी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रचारप्रमुख प्रताप पटारे यांचे भाषण झाले. याप्रसंगी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर होंडे, माजी उपसरपंच राजेंद्र चाबुकस्वार, शिवसेनेचे रावसाहेब कावरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष शेषराव साबळे, मुसाभाई इनामदार आदी उपस्थित होते. प्रा. रज्जक इनामदार यांनी आभार मानले. (वार्ताहर)