शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण प्रश्नावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब, आंदोलक सकाळी सापडले

By सुदाम देशमुख | Updated: September 27, 2024 10:42 IST

प्रवरा संगम पूलापासून खाली साधारण २ किलोमीटर अंतरावर आंदोलक मिळून आले

नेवासा (जिल्हा अहमदनगर): गेल्या नऊ दिवसापासून धनगर आरक्षण प्रश्नावर आम्ही उपोषण करत आहोत सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करीत दोन आंदोलकांनी गुरुवारी दुपारी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाले होते. त्यांचा काल रात्री रात्रभर शोध सुरू होता. अखेर सकाळी एका मच्छीमाराने दिलेल्या माहितीनुसार हे दोन आंदोलन आढळून आले आहेत. पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे. 

गुरुवारी सकाळी "आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला अखेरचा जय मल्हार" असे चिठ्ठीत नमूद करून प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे हे दोन आंदोलन गायब झाले होते. त्यांनी छत्रपती संभाजी नगर- अहमदनगर मार्गावरील प्रवारासंगम नदीच्या पुलावर ही चिठ्ठी एका कारवर ठेवली होती. तसेच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या होत्या. त्यानंतर ते गायब झाले होते. त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची शक्यता व्यक्त करून एनडीआरएफ पथक आणि प्रशासनाने त्यांचे शोधकार्य ही हाती घेतले होते. रात्र झाल्याने हे शोधकाम थांबवण्यात आले होते. अखेर शुक्रवारी सकाळी मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणि एनडीएआरएफच्या पथकाने शोध घेतला असता हे दोघेही आंदोलक नदीपात्र परिसरात मिळून आले. आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी ही सूचना स्थानिक मच्छीमारांना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असताना आणि प्रत्यक्षदर्शीच्या मासेमारी करणाऱ्याच्या सांगण्यानुसार दोघे चालत-चालत येऊन चप्पुवर झोपले होते.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.