आरटीई प्रवेशासाठी पोर्टलवर शाळेऐवजी मंदिर; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 06:25 IST2026-03-09T06:25:17+5:302026-03-09T06:25:48+5:30

आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात कोपरगाव येथील शाळेऐवजी थेट मंदिराचे लोकेशन  पोर्टलवर नमूद आहे.

Temple instead of school on RTE admission portal; Parents complain to education authorities | आरटीई प्रवेशासाठी पोर्टलवर शाळेऐवजी मंदिर; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

आरटीई प्रवेशासाठी पोर्टलवर शाळेऐवजी मंदिर; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

कोपरगाव (जि. अहिल्यानगर) : आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात कोपरगाव येथील शाळेऐवजी थेट मंदिराचे लोकेशन  पोर्टलवर नमूद आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे.

सोपान उत्तमराव लोंढे हे पुणतांबा रोड, कोपरगाव येथे राहतात. त्यांच्या पाल्याला संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज महर्षी स्कूल, कोकमठाण येथे इयत्ता पहिलीत प्रवेश हवा असल्याने, त्यांनी आरटीई ॲडमिशन पोर्टलवर अर्ज करण्यास सुरुवात केली. मात्र पोर्टलवर महर्षी शाळेऐवजी कोपरगाव बेट भागातील गुरू शुक्राचार्य मंदिराचे लोकेशन झाल्याचे दिसून आले. त्यानंतर लोंढे व इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी महर्षी स्कूलमध्ये धाव घेतली. 

पालकांमध्ये तणाव, तरी प्रशासनाशी संपर्क 

या समस्येमुळे पालकांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी त्यांनी संयम ठेवला असून, शाळेतील योग्य प्रवेशासाठी पालकांनी तत्परतेने प्रशासनाशी संपर्क साधला आहे. पालकांच्या सूचना आणि पोर्टलवरील तांत्रिक दुरुस्त्या यावरून पुढील काही दिवसांत समस्या सुटेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी योग्य सहकार्य केले तर मुलांचे प्रवेशकार्य सुरळीत पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

१० मार्चपर्यंत मुदत, सर्व्हर डाउन होण्याची शक्यता  

पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत १० मार्च पर्यंत आहे. वेबसाइटवरील सूचनेनुसार आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश अर्जांची स्थिती पाहता, सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन, पोर्टल स्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेंचे वातवारण आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत महर्षी शाळेसाठी ऑनलाइन अर्ज पात्र असूनही भरता येणार नाही. त्यामुळे आरटीई ॲडमिशन पोर्टलवर शाळेचे लोकेशन बदलून घ्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. 

Web Title : आरटीई प्रवेश: पोर्टल पर स्कूल की जगह मंदिर, अभिभावकों की शिकायत

Web Summary : कोपरगाँव में आरटीई प्रवेश में बाधा: पोर्टल पर स्कूल की जगह मंदिर का स्थान दिखा रहा है। इससे आवेदन में दिक्कतें आ रही हैं, अभिभावकों ने 10 मार्च की समय सीमा से पहले शिक्षा अधिकारियों से सुधार की मांग की है।

Web Title : RTE Admission: Temple Location Instead of School on Portal; Parents Complain

Web Summary : Parents in Kopargaon face hurdles in RTE admissions as the portal mistakenly displays a temple location instead of the school. This error is causing application issues, prompting parents to seek immediate correction from education officials before the March 10 deadline.