शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिन विशेष : २० रूपये पगाराचा लोकशिक्षक, भापकर गुरूजी

By चंद्रकांत शेळके | Updated: September 5, 2018 11:58 IST

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील राजाराम भापकर गुरूजी यांची ओळख महाराष्ट्राला, देशाला माऊंटनमॅन म्हणून असली तरी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक काम आणखी व्यापक आहे.

ठळक मुद्दे भापकर गुरूजी यांना लाभला गांधीजी, गाडगेबाबा, विनोबा भावे यांचा सहवास

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील राजाराम भापकर गुरूजी यांची ओळख महाराष्ट्राला, देशाला माऊंटनमॅन म्हणून असली तरी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक काम आणखी व्यापक आहे. शिवाय महात्मा गांधी, समाजसुधारक गाडगेबाबा, आचार्य विनोबा भावे या थोरांचा सहवास त्यांना लाभला आहे. २० रूपये पगारावर शिक्षकी पेशा पत्करलेला हा शिक्षक आज वयाच्या ८५व्या वर्षीही समाजासाठीच खस्ता खात आहे.नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे १३ नोव्हेंबर १९३३ रोजी राजाराम भापकर यांचा जन्म झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. दरम्यानच्या काळात देशात स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील तरूण स्वातंत्र्यचळवळीत झपाटून उतरले होते. त्यातच महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा नारा दिल्याने तरूण आणखीच भारावले. १९४५मध्ये नगर जिल्ह्यातील काही तरूण गांधीजींना भेटण्याच्या इच्छेने थेट पोरबंदरला (गुजरात) पोहोचले. त्यात भापकर गुरुजींचा समावेश होता. गुरूजी तेव्हा १२ वर्षांचे होते. पोरबंदरला गांधीजींशी संवाद साधण्याची संधी गुरूजींना मिळाली. ‘आपले देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांना यश येणारच आहे. तुम्हा मुलांना थेट लढ्यात सहभागी होता आले नाही तरी गावात समाजसेवा करा’, असा सल्ला गांधीजींनी दिला होता. तेव्हापासून भापकर गुरूजींना समाजसेवेची आवड लागली. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९५२ मध्ये भापकर गुरूजींना लोकल बोर्डात (आताचे जिल्हा परिषद) शिक्षकाची नोकरी मिळाली. मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथे ते शिक्षक म्हणून पहिल्यांदा रूजू झाले, तेव्हा त्यांचा पगार होता अवघा २० रूपये. तेथून पुढे पाच वर्षे त्यांनी याच पगारावर काम केले. दरम्यान, भापकर गुरूजींना समाजसुधारक गाडगे बाबांचाही सहवास लाभला. १९५०च्या काळात गाडगेबाबा अधूनमधून नगरला येत असत. त्यावेळी राष्ट्रीय पाठशाळा व माळीवाडा परिसरात स्वच्छतेची मोहीम होत असे. त्यात गाडगेबाबांसह भापकर गुरुजीही सहभागी होत. अशाच प्रकारे आचार्य विनोबा भावे यांना भेटण्याची संधीही मिळाली, असे गुरूजी आवर्जून सांगतात.सामाजिक कामासाठी घालवली हयातभापकर गुरूजींनी त्यांच्या गाव परिसरातील रस्त्याच्या कामासाठी अख्खी हयात घालवली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम करताना त्यांनी अध्यापनासह सामाजिक कामही सुरूच ठेवले. १९९० मध्ये भापकर गुरूजी सेवानिवृत्त झाले. आपल्या ३८ वर्षांच्या सेवेतील पगार, आतापर्यंतचे २८ वर्षांतील निवृत्तीवेतन आणि वेळोवेळी मिळालेल्या पुरस्कारांची लाखो रूपयांची रक्कम त्यांनी सामाजिक कामासाठीच खर्ची केली. असा हा ध्येयवेडा शिक्षक आज वयाच्या ८५व्या वर्षीही ठणठणीत आहे. आपल्या खास जुन्या स्कूटरवरून गुंडेगाव ते नगर असा ३० किलोमीटरचा फेरफटका ते आजही आठवड्यातून एकदा मारतात. तोही सामाजिक कामासाठीच.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक