तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वतःवर केले सपासप वार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 00:12 IST2026-03-16T00:11:28+5:302026-03-16T00:12:23+5:30
पाथर्डी- बीडच्या हद्दीवर असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी आज सायंकाळी स्वतःवरच वार केले. त्यामुळे त्यांना रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला. जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वतःवर केले सपासप वार!
अहिल्यानगर: पाथर्डी- बीडच्या हद्दीवर असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी आज सायंकाळी स्वतःवरच वार केले. त्यामुळे त्यांना रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला. जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची तब्येत आता स्थिर असून भाविकांनी रुग्णालया बाहेर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराजांनी नेमके स्वतःवरच वार का केले? याचे कारण समजू शकले नाही. मात्र, महाराजांची तब्येत ठीक झाल्यानंतर ते स्वतःच याबाबत स्पष्टीकरण देतील, असे भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी आमदार मोनिका राजळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, आदिनाथ शास्त्री यांनी स्वतःच व्हिडिओ करून आपली तब्येत आता ठीक असल्याचे सांगत भाविकांनी काळजी करू नये. मी लवकरच तारकेश्वर गडावर येईल, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आदिनाथ शास्त्री यांना मानणारा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा परिवार आहे.