शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

टँकरअभावी ५ गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 00:37 IST

शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मळेगाव शे। आदी ५ गावात अपुऱ्या पावसावर बंद करण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर

शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मळेगाव शे। आदी ५ गावात अपुऱ्या पावसावर बंद करण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या हालचाली नसल्याने ग्रामस्थांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपूर्ततेची पूर्तता करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे पुन्हा परत आलेले मागणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी वरील ५ गावांतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून होत आहे.भातकुडगाव मंडळात अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रशासनाने मात्र टंचाई सुविधांची मुदत संपल्याने भातकुडगावसह परिसरात सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर १ जुलैपासून बंद केलेले आहेत. परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या संकटामुळे वरील पाच गावांतील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह शेवगाव- नेवासा हमरस्त्यावरील भातकुडगाव फाट्यावर दि. ४ जुलै रोजी तब्बल ३ तास रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून याबाबत वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी यांनी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे जाहीर केले. मात्र, अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत. तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी कार्यालयाकडे त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टँकरचे प्रस्ताव सादर केले. मात्र अपूर्ततेच्या कारणामुळे परत आलेले प्रस्ताव आज सोमवारी पंचायत समितीच्या टंचाई विभागाने तहसील कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती ग्रामस्थांना सांगण्यात आली.भातकुडगाव परिसरात अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकावे लागते. पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी भायगावच्या सरपंच मनिषा आढाव, भातकुडगावचे सरपंच बाजीराव जमधडे, उपसरपंच शंकर नारळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ साळवे, देवटाकळीचे श्रीराम खरड, बक्तरपूरचे भाऊसाहेब सामृत आदी कार्यकर्त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)