शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

ससाणेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम

By admin | Updated: December 17, 2015 23:37 IST

अहमदनगर : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झालेली असतांना नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत तोडगा निघत नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

अहमदनगर : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झालेली असतांना नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत तोडगा निघत नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुंबईच्या जागेवर तोडगा निघाला तर नगरचा विषय मार्गी लागेल असा कयास व्यक्त करण्यात येत असून स्थानिक पातळीवर आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार जयंत ससाणे यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी १२ डिसेंबरला उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापासून ससाणे यांच्या उमेदवारीबाबत घोळ सुरू आहे. आधी हा विषय मुंबईत, त्यानंतर नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहचला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार ससाणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. आता उमेदवारीबाबत काँग्रेसच्या गोटातून कोणतीच अधिकृत भूमिका जाहीर होत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील गोंधळ वाढला आहे. नगरची जागा काँग्रेसची असतांनाही ही जागा राष्ट्रवादीला दिलीच कशी. काँग्रेसकडे नगरची जागा असती, तर वादच निर्माण झाला नसता, अशी कुजबुज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. या शिवाय मुंबईचा विषय मार्गी लागला तरी नगरमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीला कसा पाठींबा द्यावा, असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे. (प्रतिनिधी)