शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी यादी मतदान केंद्रावर

By admin | Updated: August 1, 2014 00:22 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची तिसरी पुरवणी यादी जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी प्रसिध्द केली असून, ही यादी मतदान केंद्रासह तहसील व प्रांत कार्यालयात सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे़

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची तिसरी पुरवणी यादी जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी प्रसिध्द केली असून, ही यादी मतदान केंद्रासह तहसील व प्रांत कार्यालयात सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे़ राजकीय पक्षांसाठी पुरवणी यादी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले़विधानसभा निवडणुकीची तिसरी पुरवणी यादी जिल्हा निवडणूक शाखेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे़ ही यादी जिल्ह्यातील तीन हजार ५६७ मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहे़ नाव नोंदणी केलेल्या मतदारांना आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची माहिती व्हावी, यासाठी ही यादी प्रत्येक तहसील कार्यालयांत पाहावयास मिळणार आहे़ प्रांत कार्यालयातही पुरवणी मतदारयादी उपलब्ध असेल़ फोटोसह पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात आली असून, निवडणूक शाखेच्या संकेत स्थळावरही ती लवकरच उपलब्ध होणार आहे़ राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे़ मतदारसंघातील माहितीसाठी यंत्रणाही कामाला लागली आहे़ मतदारसंघातील मतदारांच्या यादीची राजकीय पक्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे़ मतदारसंघात किती मतदार आहेत, याची माहिती त्यांना सहज उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे इच्छुकांचे काम सोपे झाले असून, मतदारांनाही त्यांचे नाव यादीत आले किंवा नाही, ते तपासता येणार आहे़ नाव चुकीचे असल्यास ते दुरुस्त करून देण्याचीही व्यवस्था असणार आहे़ याशिवाय नवीन नाव नोंदणीची प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील़ ज्यांची नावे पुरवणी यादीत नाहीत, त्यांनी फार्म सहा भरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़सैनिकांची यादीयेथील लष्करातील जवानांनी नाव नोंदणी केली आहे़ नाव नोंदणी केलेल्या सैनिकांचीही पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे़ सैनिकांनी आपले नाव यादीत आले किंवा नाही, ते तपासून घ्यावे, असे यावेळी सांगण्यात आले़कर्मचारी अजूनही उत्तरप्रदेशातचनिवडणुकीसाठी सन २००६ नंतरच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे़ या यंत्रांची शुक्रवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते़ मात्र ही यंत्र अद्यापही उपलब्ध झाली नाही़ ती आणण्यासाठी कर्मचारी उत्तरप्रदेशमध्ये गेले आहेत़ ते अद्याप आले नसल्याचे सांगण्यात आले़