शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयात राजीनामासत्र

By admin | Updated: June 26, 2023 14:57 IST

कर्जत : गेल्या पाच वर्षांपासून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत़

कर्जत : गेल्या पाच वर्षांपासून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत़ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रमुख पदावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र यामुळे रुग्णांवर उपचार करायचे कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे़ या उपजिल्हा रुग्णालयातील अखेरचे वैद्यकीय अधिकारी एऩ एस़ राठोड यांनीही राजीनामा दिला असून, शनिवारी (दि़६) त्यांना कार्यमुक्त करण्यात आले़दहा वर्षापूर्वी कर्जत येथे दोन कोटी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय उभारले. या भागातील रुग्णांना बाहेर जाण्याची वेळ येऊ नये म्हणून अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या़ मात्र, मंजूर पदे अद्याप न भरल्यामुळे अनेक सुविधा कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत़ कर्जत येथे या उपजिल्हा रुग्णालयात दररोज किमान चारशे रुग्ण उपचारासाठी येतात़ मात्र, येथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार कोणी करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे़उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकाचे एक पद मंजूर आहे़ मात्र ते २००९ पासून रिक्त आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात पदे मंजूर आहेत. यातील काहींनी राजीनामे दिले तर काहींचा नेमणुकीचा कार्यकाळ संपल्यामुळे सहा जागा रिक्त होत्या़ तर शनिवारी (दि़६) शेवटचे वैद्यकीय अधिकारी एन. एस. राठोड यांनी राजीनामा दिला असून, त्यांना सायंकाळी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथे एकही वैद्यकीय अधिकारी नाही. येथील रिक्त पदाबाबत वरिष्ठ पातळीवरुन कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत़ विशेष म्हणजे अद्ययावत यंत्रणाही वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे वापराविना खराब झाली आहे़ याकडेही वरिष्ठ कानाडोळा करीत आहेत. या रुग्णालयात पाण्याची व विजेची सोय नाही. ब्लड बँक बंद आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे समस्यांच्या गर्तेतून उपजिल्हा रुग्णालय बाहेर निघणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे़ या रुग्णालयातील वैद्यकीय अनास्थेची वस्तुस्थिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्यामुळे बाहेर आली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. (तालुका प्रतिनिधी)