इमामपूर घाटात ट्रेलर थांबवून स्टीलची चोरी, दीड कोटीचे स्टील जप्त; १३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 23:02 IST2022-05-22T23:02:14+5:302022-05-22T23:02:48+5:30
नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात स्टीलचा ट्रेलर थांबवून त्यातून स्टीलची चोरी करताना पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने दीड कोटींचे स्टील जप्त केले.

इमामपूर घाटात ट्रेलर थांबवून स्टीलची चोरी, दीड कोटीचे स्टील जप्त; १३ जणांना अटक
अहमदनगर :
नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात स्टीलचा ट्रेलर थांबवून त्यातून स्टीलची चोरी करताना पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने दीड कोटींचे स्टील जप्त केले. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
जालना येथून हे स्टील ट्रेलरमधून पुण्याकडे नेत असतानाच हे ट्रेलर इमामपूर घाटातील एका हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत थांबवून तिथे स्टीलची चोरी होत असल्याची माहिती नाशिक येथील पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने छापा टाकून या मोकळ्या जागेत उभे असलेले स्टीलने भरलेले तीन ट्रेलर जप्त केले आहेत. या स्टीलची किंमत १ कोटी ५० लाख इतकी आहे. चालकासह १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.