शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST

पारनेर : राज्य सरकार कोरोनाबाबतची कसलीही आकडेवारी लपवत नाही. आम्ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे खरे आकडे जगासमोर मांडतो. त्याबाबत होणारे ...

पारनेर : राज्य सरकार कोरोनाबाबतची कसलीही आकडेवारी लपवत नाही. आम्ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे खरे आकडे जगासमोर मांडतो. त्याबाबत होणारे सर्व आरोप चुकीचे आहेत. रेड आणि ग्रीन झोनबाबत नियमावली कशी राहील याबाबत ३१ तारखेनंतरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुश्रीफ यांनी बुधवारी सकाळी आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली भाळवणी (ता.पारनेर) येथे सुरू असलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, अ‍ॅड. राहुल झावरे, विक्रमसिंह कळमकर, राजेश्वरी कोठावळे, डॉ. बाळासाहेब कावरे, कारभारी पोटघन, बापूसाहेब शिर्के, अभयसिंह नांगरे, दत्ता कोरडे, मुकुंद शिंदे, डॉ. मानसी मानोरकर, दीपक लंके, बाळासाहेब खिलारी, प्रमोद गोडसे, संदीप चौधरी, सचिन पठारे, गणेश भापकर आदी उपस्थित होते. मुश्रीफ यांनी या कोविड सेंटरला यावेळी दोन लाखांची मदत जाहीर केली.

मुश्रीफ म्हणाले, एखादा लोकप्रतिनिधी स्वतःचा जीव धोक्यात घालून किती व कसे काम करू शकतो हे लंके यांनी राज्याला दाखवून दिले. आपली जनता दुःखी, कष्टी आहे. महामारीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिला आधार देणे. तिच्या सोबत राहून हा संसर्गजन्य आजार आहे हे माहिती असतानाही दिवस-रात्र सेवा करणे सोपे नाही. ते व्रत त्यांनी घेतले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

लंके म्हणाले, जनतेसाठी शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले. लोक या रोगाला घाबरले नाहीत. आत्मविश्‍वास, जिद्दीने त्याला तोंड दिले. हसतमुखाने परिस्थितीशी मुकाबला केला तर माणसाला काही होऊ शकत नाही. त्यासाठी आम्ही कोविड सेंटरमध्ये प्रयत्न केले, असे लंके यांनी सांगितले.

---

फोटो ओळी

भाळवणी येथील कोविड सेंटरची पाहणी करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार निलेश लंके व इतर.