पोहेगाव दूरक्षेत्र सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:24+5:302021-07-09T04:14:24+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलीस ठाणे अंतर्गत दूरक्षेत्र मंजूर आहे. मात्र, या दूरक्षेत्रात कर्मचारी उपस्थित राहत ...

पोहेगाव दूरक्षेत्र सुरु करा
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलीस ठाणे अंतर्गत दूरक्षेत्र मंजूर आहे. मात्र, या दूरक्षेत्रात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने अवैध धंद्यासह घरफोड्या, दरोडे अशा घटना घडत आहे. त्यामुळे येथील दूरक्षेत्र सुरू करावे, अन्यथा २६ जुलै रोजी दूरक्षेत्रासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा पोहेगाव ग्रामपंचायतीच्या मार्फत शिर्डी पोलीस ठाण्यास दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या दूरक्षेत्रासाठी एक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, चार पोलीस हेड कॉन्स्टेबल, आठ पोलीस नाईक व दहा पोलीस शिपाई अशी एकूण २५ पदे मंजूर आहेत. या दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नेमणूक कागदोपत्री दाखवण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात हे दूरक्षेत्र कधीही उघडले जात नाही. याबाबत अनेक वेळा लेखी पत्र दिले असून समक्ष भेटून देखील मागणी केली आहे. कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. महिन्यात ५ जूनला पोहेगावातील एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने तोडून ५ लाख ७९ हजार ५०० रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.