शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रचारक गाजवणार मैदान

By admin | Updated: September 27, 2014 00:15 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस बाकी असतांना युती-आघाडीचा घटस्फोट झाला. यामुळे ऐनवेळी सर्व पक्षांची तुल्यबळ उमेदवारासाठी शोधाशोध सुरू झाली.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस बाकी असतांना युती-आघाडीचा घटस्फोट झाला. यामुळे ऐनवेळी सर्व पक्षांची तुल्यबळ उमेदवारासाठी शोधाशोध सुरू झाली. दुसरीकडे पक्षातून डावलेले गेलेले उमेदवार विरोधी पक्षाच्या वाटेवर आहेत. १ आॅक्टोबर माघारीचा दिवस असून प्रचाराचा कालावधी तोकडा पडणार आहे. यासाठी सर्वच पक्षाकडून स्टार प्रचारकांचा आधार घेण्यात येणार असून मतदारांची मात्र चांगलीच राजकीय करमणूक होणार आहे.यंदा विधानसभा निवडणुकीत दररोज नाट्यपूर्ण घटना आणि घडामोडी घडतांना दिसत आहे. आधी आघाडी आणि महायुती संयुक्तपणे लढणार असल्याचे चित्र होते. मात्र, गुरूवारी चारही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. यासह मनसे आणि अन्य कम्युनिस्ट पार्टी, भारिप बहुजन, लालनिशाण, लोकशासन यासह अन्य लहानमोठ्या पक्षांनी संयुक्त आघाडी केलेली आहे. पाच प्रमुख पक्षांसह अन्य लहानमोठ्या आघाड्या सोबत अपक्ष म्हणजे प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चांगलीच गर्दी होणार आहे. आपल्या पक्षाचे ध्येय धोरण मतदारांपर्यंत पोहचविण्यास सर्वच पक्षांना कालावधी कमी पडणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची व्याप्ती आणि निवडणुकीत उमेदवारांची वाढलेली संख्या यामुळे कार्यकर्त्यांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आणि सभेत जास्त गर्दी जमवण्यासाठी स्टार प्रचारकांची आवश्यकता भासणार आहे. १ आॅक्टोबर अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर खऱ्याअर्थाने निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य मतदारसंघात चार प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने रंगत वाढणार आहे.प्रचारासाठी अवघा १४ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. यात शेवटचे दोन दिवस जाहीर प्रचार थांबणार असून अवघ्या ११ दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. स्टार प्रचारक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार असून त्यामुळे नगरकरांची चांगलीच राजकीय करमणूक होणार आहे. (प्रतिनिधी)