शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापती निवड वादात

By admin | Updated: April 10, 2024 15:50 IST

पाथर्डी : सभापती उषाताई अकोलकर व त्यांचे पती विष्णुपंत अकोलकर यांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घरी नेले व मला मतदानापासून वंचित ठेवले,

पाथर्डी : सभापती उषाताई अकोलकर व त्यांचे पती विष्णुपंत अकोलकर यांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घरी नेले व मला मतदानापासून वंचित ठेवले, असा जबाब पंचायत समिती सदस्या कलावती गवळी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिला आहे़यामुळे तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक वादात सापडली आहे़रविवारी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी झाल्या. पंचायत समितीत एकूण आठ सदस्य असून, यामध्ये माजी आ.राजीव राजळे यांना मानणारे चार तर प्रताप ढाकणे यांना मानणारे तीन व एक सदस्य मनसेचा होता. राजळे गटातर्फे सभापतीपदासाठी संभाजी पालवे तर उपसभापती पदासाठी देविदास खेडकर यांची नावे निश्चित झाली होती. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.परंतु एका रात्रीत नाट्यमय घडामोडी घडून राजळे गटाच्या उषाताई अकोलकर आ.घुले-ढाकणे गटात दाखल झाल्या़ त्यामुळे आ.घुले-ढाकणे गटाचे संख्याबळ चार झाले. राजळे यांच्याकडेही चार सदस्य झाले. परंतु मतदानासाठी राजळे गटाच्या कलावती गवळी गैरहजर होत्या. त्यामुळे सातच सदस्य पंचायत समितीत उपस्थित होते. परंतु राजळे गटाच्या तीन सदस्यांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने चारच सदस्यांचे मतदान झाले़ यामध्ये उषाताई अकोलकर यांची सभापतीपदी तर बेबीताई केळगंद्रे यांची उपसभापतीपदी निवड झाली. कलावती गवळी या गैरहजर नसून त्यांचे अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पाथर्डी पोलिसात दिली होती. त्यावरुन नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात संभाजी पालवे, देविदास खेडकर व गवळी समर्थकांनी धरणे आंदोलन केले़ सायंकाळी पोलिसांनी सभापती उषाताई अकोलकर व विष्णुपंत अकोलकर यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. (तालुका प्रतिनिधी)सोमवारी सकाळी कलावती गवळी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, उषाताई अकोलकर व विष्णुपंत अकोलकर हे माझ्या घरी आले व मतदानासाठी चला असे म्हणाले़ त्यानुसार मी त्यांच्याबरोबर गेले व त्यांनीच मला मतदानापासून वंचित ठेवले़ गवळी यांच्या जबाबामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, या निवडी वादात सापडल्या आहेत़ गवळी यांना नेण्यासाठी वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही निवड प्रक्रिया रद्द करावी यासाठी काहींनी उच्च न्यायालयात अपील केल्याची माहिती हाती आली आहे़