कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा गायी मुक्तता, पोलिस पाहताच वाहनचालकासह दोघे फरार
By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 28, 2023 14:23 IST2023-10-28T14:22:56+5:302023-10-28T14:23:36+5:30
...मात्र वाहनचालक व अन्यएकजण पोलिसांना पाहताच फरार झाले.

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा गायी मुक्तता, पोलिस पाहताच वाहनचालकासह दोघे फरार
अहमदनगर : शुक्रवारी मध्यरात्री टेम्पोमधून सहा गायींची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. मात्र वाहनचालक व अन्यएकजण पोलिसांना पाहताच फरार झाले.
घटनेबाबात अधिक माहिती अशी की, एमएच १५ सीके ३६६७ या टेम्पोमधून कत्तलीसाठी गायी नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी नगर-मनमाड रस्त्यावरील पूणतांबा चौफूली येथे रात्री साडेबारा वाजता पाठलाग करून टेम्पो अडविला. परंतू वाहनचालक व अन्य एकजण टेम्पो सोडून फरार झाले. टेम्पोमध्ये सहा जर्सी गायी होत्या. कत्तलीपासून गायींची मुक्तता झाली आहे.
याप्रकरणी सहा गायी व टेम्पो असा एकूण दोन लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुशील शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पोचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पो.हे.कॉ. आर. पी. पुंड करीत आहेत.