पर्यावरण विभागाने अनेक मुद्द्यांचा व सोईसुविधांचा सर्व्हे करून नगरपालिकांचे मूल्यांकन केले होते. यामध्ये विशेष करून पर्यावरण, जल व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन या मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्या संबंधीच्या सोईसुविधांची तपासणी करण्यात आली. नागरी सुविधांचे आधुनिकीकरण करणे हा राज्य सरकारचा या स्पर्धा घेण्यामागचा उदात्त हेतू होता, असे ससाणे यांनी पत्रकात म्हटले आहे.
नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना हे अभियान समजले नाही. त्यामुळे या स्पर्धेमध्ये पालिकेने मनापासून भाग घेतला नाही. श्रीरामपूरकरांच्या सोईसुविधांमध्ये भर तर पडली नाहीच, परंतु गुणांकनात नगरपालिका पिछाडीवर पडली.
वैजापूर नगरपालिकेचा पाचवा, संगमनेर सहावा, मनमाड नऊ, देवळाली प्रवरा २४, राहुरी २८, कोपरगाव ४८, श्रीगोंदा ५८ , कर्जत पालिकेने ५९वा क्रमांक मिळवून यात श्रीरामपूरपेक्षा आघाडी घेतली.
‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांतर्गत पाण्याची कमतरता असलेल्या व प्राथमिक सुविधांचा अभाव असलेल्या वैजापूर, कोपरगाव, कर्जत यांसारख्या नगरपालिकांनी श्रीरामपूरला मागे टाकत एक प्रकारे आपले वाभाडे काढले आहेत, परंतु फोटो काढण्यात व्यस्त असलेल्या सत्ताधाऱ्यांना याचे गांभीर्य लक्षात आले नाही, असे ससाणे यांनी म्हटले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानानंतर राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानातही शहरवासीयांची निराशा झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
-----