शेतात शॉर्टसर्किट झालं अन् दोन एकर गहू जळून खाक, VIDEO पाहून काळीज तीळ-तीळ तुटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 19:30 IST2022-03-18T19:30:19+5:302022-03-18T19:30:50+5:30
अहमदनगर : तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी गणेश बेरड यांचा दोन एकर गहू शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी ...

शेतात शॉर्टसर्किट झालं अन् दोन एकर गहू जळून खाक, VIDEO पाहून काळीज तीळ-तीळ तुटेल
अहमदनगर : तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी गणेश बेरड यांचा दोन एकर गहू शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
VIDEO: शॉर्टसर्किटमुळे दोन एकर गहू जळून खाक, अहमदनगरमधील घटना pic.twitter.com/RIAmfpRIkG
— Lokmat (@lokmat) March 18, 2022
आग लागल्याचे समजताच गावातील ग्रामस्थ सरपंच प्रतिक शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचा जोर जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येणे शक्य नव्हते. गव्हाच्या शेतात स्प्रिंकलर ठिबक बसवले होते. ते ही जळून खाक झाले आहे. जवळपास तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.