गावातील अनेक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहेत. त्यामध्ये चोरटे कैद झाले असून लवकरात लवकर त्यांना जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चोरट्यांनी योगेश मोरगे यांचे किराणा दुकान फोडून २५ हजार रुपये किमतीचा किराणा माल चोरून नेला. याशिवाय शेजारीच कडूबाई गंगाधर नागुडे यांचे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून कपाटातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच इतर साहित्य अस्ताव्यस्त केले.
गावात चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी अनेक दुकानांबाहेरील विजेचे दिवे फोडले, सीसीटीव्ही कॅमेरे उलट्या दिशेने फिरवले. आयडीबीआय बँकेचा कॅमेरादेखील फिरवला. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून चोरटे लवकरच जेरबंद होतील, असे आश्वासन दिले.