धक्कादायक! विहिरीत आढळला शीर, हात नसलेला मृतदेह; कॉलेज तरुण गायब असल्याने तर्क-वितर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:57 IST2025-03-13T15:55:49+5:302025-03-13T15:57:19+5:30

हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी, कोठे व का केली, असावी या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Shocking A body without a head and hands was found in a well Police face a challenge in identifying it | धक्कादायक! विहिरीत आढळला शीर, हात नसलेला मृतदेह; कॉलेज तरुण गायब असल्याने तर्क-वितर्क

धक्कादायक! विहिरीत आढळला शीर, हात नसलेला मृतदेह; कॉलेज तरुण गायब असल्याने तर्क-वितर्क

Ahilyanagar Crime : शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील विहिरीत बुधवारी सकाळी आढळला. याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

हा मृतदेह वीस वर्षीय तरुणाचा असावा आणि त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा-शिरुर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेण्यात येत आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारी घटनास्थळी दाखल झाले. दाणेवाडी येथील विठ्ठल दगडू मांडगे यांच्या मालकीची ही विहीर आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी, कोठे व का केली, असावी या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
 
काही दिवसांपूर्वी गावातील एक तरुण बेपत्ता
दाणेवाडी येथील एक वीस वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तो शिरुर येथील सीटी बोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. मात्र, या मृतदेहाला शीर नसल्याने ओळख पटलेली नाही.

Web Title: Shocking A body without a head and hands was found in a well Police face a challenge in identifying it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.