शिवसेनेचे खासदार म्हणाले, साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:37 IST2020-10-17T16:36:36+5:302020-10-17T16:37:17+5:30

साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे विनंती करणार आहे, असे शिरडीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

Shiv Sena MP said, my role is to start Sai Mandir | शिवसेनेचे खासदार म्हणाले, साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका

शिवसेनेचे खासदार म्हणाले, साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका

अहमदनगर : साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे विनंती करणार आहे, असे शिरडीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

अहमदनगर येथे शनिवारी खासदार लोखंडे यांच्या संपर्क कायार्लयाचे लोकार्पण झाले. यावेळी लोखंडे बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत मंदिर बंदचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुन्हा कोरोना वाढू नये याची दक्षता म्हणून मंदिर बंदचा निर्णय घेतला आहे. तो योग्य आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे हे लवकरच मंदिर खुले करण्याचा  निर्णय घेतील.

मंदिरे उघडण्याचा निर्णय केवळ एका मंदिराचा नाहीतर संपूर्ण राज्यातील सर्व मंदिरांचा आहे, असेही लोखंडे यावेळी म्हणाले.

Web Title: Shiv Sena MP said, my role is to start Sai Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.