शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी: हॉटेलमधील खोलीचा दरवाजा होता बंद, पोलीस आले आणि दार तोडून आत गेले तेव्हा विशाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:07 IST

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका तरुणाने टोकाचा निर्णय घेत स्वतःचे आयुष्य संपवले. हा तरुण संगमनेर तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Ahilyanagar Crime News: शिर्डी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेनंतर काही काळ हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय २२) असे असून, तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता व सध्या राहाता तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता. 

सोमवारी दुपारपासून दरवाजा होता बंद

विशाल हा शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करत होता. सोमवारी दुपारपासून संबंधित हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. 

अखेर संशय बळावल्याने तत्काळ शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

दरवाजा तोडला आणि आत विशाल लटकलेल्या अवस्थेत दिसला

पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडण्यात आला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी सखोल पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. 

आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली आहे का, मोबाइलमध्ये काही संदेश, कॉल रेकॉर्ड किंवा मानसिक तणावाची कारणे आहेत का, याचा तपास सुरू आहे. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shirdi: Hotel room locked, police break in, found worker dead.

Web Summary : A 22-year-old hotel worker in Shirdi, originally from Sangamner, was found dead by hanging in his hotel room. Police broke down the door after he didn't respond. An investigation is underway to determine the cause of death.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीshirdiशिर्डीDeathमृत्यूAhilyanagarअहिल्यानगरPoliceपोलिस