शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

शिरसगाव प्राथमिक शाळेत सौर अभ्यासिकेचे धडे!

By admin | Updated: December 15, 2015 23:17 IST

रियाज सय्यद, संगमनेर आदिवासी... शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आदिवासी विद्यार्थी संगणक व डिजिटल ज्ञानदानाचे धडे गिरवू लागले आहेत.

रियाज सय्यद, संगमनेर आदिवासी... अतिदुर्गम... डोंगराळ... खडकाळ माळरानावरच्या शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लोकसहभागातून साकारलेल्या सौर अभ्यासिकेत आदिवासी विद्यार्थी संगणक व डिजिटल ज्ञानदानाचे धडे गिरवू लागले आहेत. शंभर टक्के भारनियमनमुक्त शाळेने आदर्श निर्माण केला आहे. शिरसगाव(ता. संगमनेर) प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या ३७ विद्यार्थ्यांची संख्या शंभर टक्के आदिवासी आहे. आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचावे, या उद्देशाने मुख्याध्यापक सुनील वाडेकर व शिक्षक अरूण कासार यांनी पुढाकार घेतला. शिक्षकांची जिद्द व तळमळ पाहून ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी जमा केला. ग्रामीण भागात सततचे भारनियमन, वादळ, पावसाळ्यात नेहमी गायब होणारी वीज यामुळे शाळा संगणकीकृत, डिजिटल असूनही त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. शाळेतील मोलामहागाची संगणकीकृत व डिजिटल उपकरणे धूळखात पडू लागल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी त्यांचा उपयोग व्हावा, यासाठी शिरसगाव शाळेने ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सौर ऊर्जा निर्मितीचा अभिनव प्रयोग केला. शाळा संगणकीकृत व डिजिटलायजेन करण्यासाठी ७ संगणक, १ प्रोजेक्टर, २ पॅनल, २ बॅटऱ्या, १ चार्ज कंट्रोलर, १ इव्हर्टर अशी मोलामहागाची तांत्रिक उपकरणे बसविण्यात आली. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ७५० वॅट वीज निर्मिती होवू लागली अणि बघता-बघता शाळेत सौर उर्जेचा लटलखाट झाला. शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, म्हणून सहा संगणकाद्वारे ‘एन-कॉम्प्युटींग’ प्रणाली जोडून विद्यार्थ्यांना संगणकाचा बेसीक तर एका संगणकावर सॉफ्टवेअरद्वारे अभ्यासक्रम शिकविला जातो. सौर अभ्यासिकेत पहिली ते पाचवीचे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. कुठलेही भारनियमन नाही, वीज बील नाही, पूर्ण दाबाने मिळणारी वीज कोणत्याही उपकरणास हानीकारक नाही. जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या ‘सौर शाळा-सौर अभ्यासिका’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून शिरसगाव शाळा भारनियमनमुक्त होवून सौरऊर्जा निर्मितीचे केंद्र बनले आहे. अतिदूर्गम आदिवासी शाळेच्या या सौर अभ्यासिका उपक्रमाने शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. (प्रतिनिधी)