कडूस म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांनी अतिशय चांगले काम केले. आता मुलांच्या हितासाठी आपण अजून जोमाने काम करावे. उपशिक्षणाधिकारी धनवे, कासार, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, गुरुमाउलीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षक बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन नारायण पिसे व मनोजकुमार सोनवणे यांनी केले. शिक्षक संघाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोकूळ कळमकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष बाबा खरात, संतोष दुसुंगे, राजू राहाणे, शरद सुद्रिक, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाट, नाना बडाख, संचालक अनिल भवार, गंगाराम गोडे, सुयोग पवार, अविनाश निंबोरे, आर. टी. साबळे, किसन खेमनार, विठ्ठल फुंदे आदी उपस्थित होते.
--------------
चार्ज घेतला तर शाळेवर शिक्षक राहणार नाहीत...
शिक्षणाधिकारी कडूस हे माध्यमिक विभागात बदलून आले, मात्र त्याचा सर्वाधिक आनंद जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना झाला आहे, असे बँकेचे अध्यक्ष पठाण यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर कडूस म्हणाले की, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी चार्ज नसताना ११ शिक्षक निलंबित केले होते. आम्ही दोघांनी जर प्राथमिक विभागाचा चार्ज घेतला तर जिल्ह्यातील शाळांवर शिक्षक राहतील का? त्यामुळे आम्ही काही चार्ज घेणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी केल्याने पुन्हा हशा पिकला.
------------
फोटो - २० शिक्षक बँक
प्राथमिक शिक्षक बँक, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाउली मंडळाच्या वतीने माध्यमिक विभागाचे नूतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचा सत्कार करण्यात आला.