शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सेट टॉप बॉक्सच्या किमतीबाबत संभ्रम!

By admin | Updated: December 16, 2015 23:06 IST

अहमदनगर : सेट टॉप बॉक्सच्या किमतीवरून शहरासह जिल्ह्यात चांगलाच गोंधळ सुरू झाला असून, एक बॉक्स बसविण्यासाठी एक ते दीड हजाराची मागणी केली जात आहे़

अहमदनगर : सेट टॉप बॉक्सच्या किमतीवरून शहरासह जिल्ह्यात चांगलाच गोंधळ सुरू झाला असून, एक बॉक्स बसविण्यासाठी एक ते दीड हजाराची मागणी केली जात आहे़ त्यामुळे केबलधारक बॉक्स बसविण्यास सपशेल नकार देऊ लागले आहेत़ विशेष म्हणजे बॉक्सच्या किमतीबाबत शासनाचेही निर्देश नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे़ शासनाच्या करमणूक विभागाकडून केबलधारकांना सेट टॉप बॉक्स बसविण्याची योजना सुरू केली़ बॉक्स बसविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे़ दिलेल्या मुदतीत सेट टॉप बॉक्स न बसविल्यास केबल सेवा खंडित करण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे़ शहरासह जिल्ह्यात एकूण ४६ हजार ७४० केबलधारक आहेत़ यापैकी १९ हजार शहर व परिसरातील आहेत़ शहर व परिसरात १०३ केबल आॅपरेटर आहेत़ आॅपरेटरांकडून सेट टॉप बॉक्स बसविण्याची तयारी सुरू आहे़ त्यांनी विविध कंपन्यांचे सेट टॉप बॉक्स खरेदीही केले आहेत़ सेट टॉप बॉक्सची किंमत एक ते दीड हजार रुपये आहे़ महिना दोनशे रुपयांत मिळणाऱ्या केबल सेवेसाठी एकदम एक ते दीड हजार रुपये का द्यायचे, असा प्रश्न केबलधारकांकडून उपस्थित केला जात आहे़ सेट टॉप बस्विल्यानंतर चॅनल्सची संख्याही वाढेल़ त्याचबरोबर चित्र सुस्पष्ट दिसण्यासही मदत होईल़ परंतु, एकदम दीड हजार देणे शक्य नाही, असे केबलधारकांचे म्हणणे आहे़ केबल जोडणी कायम ठेवायची असल्यास दिलेल्या मुदतीत बॉक्स बसविणे बंधनकारक आहे़ बॉक्स दर्जेदार कंपनीचाच मागविण्यात आला आहे़ त्यामुळे एक ते दीड हजार रुपये लागतात़ मात्र ते देण्यास केबलधारक तयार होत नाहीत़ त्यामुळे बॉक्स बसविण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केबल आॅपरेटरांनी आढावा बैठकीत केली़ मुदतवाढीबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे़ सेट टॉप बॉक्स बसविणे सक्तीचे करण्यात आले़ पण, किमतीवर शासनाचेही नियंत्रण नाही़ यासंदर्भात कोणतेही निर्देश नाहीत, असे सांगून महसूलच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत़ त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्न केबलधारकांसमोर आहे़