नगर तालुक्यात ४९ गावांची जलयुक्तसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:50 IST2018-04-19T20:02:08+5:302018-04-20T10:50:01+5:30
दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.

नगर तालुक्यात ४९ गावांची जलयुक्तसाठी निवड
केडगाव : दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.
जलयुक्त योजनेत पहिल्या वर्षी तालुक्यातील १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा या योजनेत समावेश झाला. या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली. नदी खोलीकरण, रुंदीकरण, समतलचर, बांध बंधिस्ती, दगडी बंधारे अशा कामांचा यात समावेश आहे. आता सन २०१८ -२०१९ या वषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली आहे.कृषी विभागामार्फत या योजनेसाठी गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. आता तालुक्यातील जवळपास सर्वच गावांची या योजनेसाठी निवड झाल्याने दुष्काळाच्या झळा वषार्नुवर्षे सोसणा-या तालुक्याला आता दुष्काळाच्या शापातून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.
हि शासकीय योजना असूनही गावांचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांची आज मोठी चढाओढ लागली होती. अगदी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सोशल मिडीयाचा आधार घेत या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आमच्यामुळेच इतक्या गावांचा जलयुक्त योजनेत समावेश झाल्याचे राजकीय श्रेय लाटण्याच्या पोस्ट दिवसभर सोशल वर फिरत होत्या.सध्या तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची तयारी सुरु आहे. २५ गावांचा सहभाग असला तरी जेमतेम चार ते पाच गावातच सध्या श्रमदानाचे काम सुरु आहे. गुंडेगावने यात आघाडी घेतल्यानंतर आता सारोळा कासार, मजले चिंचोली, मांजरसुंबा, डोंगरगण या सारखी बोटावर मोजण्याइतकी गावे सरकारी योजनेवर अवलंबून न राहता श्रमदानाच्या माध्यमातून आपले गाव पाणीदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.
या गावांचा झाला नव्याने समावेश
बु-हाणनगर, निंबोडी, वारूळवाडी, आगडगाव, बाळेवाडी, भातोडी पारगाव, देवगाव, खांडके, माथनी, मेहेकरी, पारेवाडी, दशमी गव्हाण, कोल्हेवाडी, सांडवे,टाकळी काझी, भिंगार, नागरदेवळे, शहापूर, रतडगाव, बारा बाभळी, सोनेवाडी (पिला), जांब, नागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक, देहेरे, कोळपे आखाडा, विळद, खारे कजुर्ने, शिंगवे नाईक, इस्लामपूर, नांदगाव, सोनेवाडी(चास), हमिदपूर, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, दरेवाडी, खंडाला, वाळूंज, आंबीलवाडी, गुणवडी, राळेगण म्हसोबा, मठपिंप्री, नारायणदोहो, शिराढोण, वाकोडी, बुरूडगाव, अरणगाव.