शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

चायना मांजापासून नगरकरांचा जीव वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

चायना मांजापासून नगरकरांचा जीव वाचविण्यासाठी पतंगमुक्त संक्रांत साजरी करावी, असे आवाहन हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी केले आहे. ...

चायना मांजापासून नगरकरांचा जीव वाचविण्यासाठी पतंगमुक्त संक्रांत साजरी करावी, असे आवाहन हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी केले आहे.

संक्रांतीनिमित्त नगर शहरात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. पतंग उडविण्यासाठी बहुतांशी जण चायना मांजाचा वापर करतात. हा मांजा सहजासहजी तुटत नाही. पतंग उडविल्यानंतर हा मांजा रस्त्यावर, इमारती, घरे, विजेचे खांब व झांडांवर अडकून राहतो. वाहन चालविताना हा मांजा अटकून नगर शहरात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पक्ष्यांचा जीव गेला आहे. पोलिसांनी मागील आठ दिवसांत शहरात विविध दुकानांवर छापे टाकून चायना मांजा जप्त करत गुन्हे दाखल केले आहेत. चायना मांजा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे, मात्र पतंग उडविताना कोणाच्या हातात चायना मांजा दिसला तर त्याच्यावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

----------------------------------

पालकांनीही घ्यावी दक्षता

पालकांनी मुलांना पतंग उडविण्यासाठी साधा दोरा द्यावा. चायना मांजा असल्यास काढून घ्यावा. दोऱ्याची लांबी कमी द्यावी.

घराच्या छतावरच गर्दी करू देऊ नये.

वापरताल चायना मांजा तर होईल तीन महिन्यांचा कारावास

चायना मांजाची विक्री व वापर करताना आढळून आलेल्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८ व ३३६ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम चे कलम ५,१५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कलम १८८ अंतर्गत एक महिन्याचा साधा कारावास व दोनशे रुपये दंड तर कलम ३३६ अंतर्गत तीन महिन्यांचा कारावास तसेच २५० रुपये दंडाची तरतूद आहे.

------------------------------------------------------------

चायना मांजाची विक्री रोखण्यासाठी नगर शहरात पोलीस पथके तैनात करण्यात आलेली आहे. तपासणी मोहिमेत अनेक ठिकाणी मांजा जप्त करून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. चायना मांजा विक्रीविरोधात तपासणी मोहिम येणाऱ्या काळातही सुरूच राहणार आहे. विक्रेत्यांनी चायना मांजाची विक्री करू नये तसेच पर्यावरणमुक्त संक्रात साजरी करण्यासाठी पतंग उडवू नयेत. कायद्याचे उल्लंघन करताना कुणी आढळून आले तर कडक कारवाई केली जाणार आहे.

- विशाल ढुमे, पोलीस उपाधीक्षक नगर शहर

फोटो १३ मांजा

ओळी- शहरातील बागडपट्टी येथून पतंग स्टॉलची तपासणी करताना महापालिकेचे पथक