हॉटेल व्यवसायिक महिलेवर स्वयंपाक्याचा अत्याचार, गुन्हा दाखल
By शेखर पानसरे | Updated: September 18, 2022 21:41 IST2022-09-18T21:41:07+5:302022-09-18T21:41:07+5:30
संगमनेर : संगमनेरातील हॉटेल व्यवसायिक असलेल्या २८ वर्षीय विवाहित महिलेवर नाशिक जिल्ह्यातून हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला आणलेल्या व्यक्तीने अत्याचार ...

हॉटेल व्यवसायिक महिलेवर स्वयंपाक्याचा अत्याचार, गुन्हा दाखल
संगमनेर :संगमनेरातील हॉटेल व्यवसायिक असलेल्या २८ वर्षीय विवाहित महिलेवर नाशिक जिल्ह्यातून हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला आणलेल्या व्यक्तीने अत्याचार केला. ही घटना १५ सप्टेंबरला सकाळी दहा वाजेच्या सुमारास विवाहित महिलेच्या हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी दोन दिवसांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
हरिचंद्र कचरू शेवरे (रा.वाळुंज ता. दिंडोरी जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात राहते. कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील एका गावच्या शिवारात महिलेचे हॉटेल आहे. येथे स्वयंपाकी म्हणून काम करण्यासाठी हरिचंद्र शेवरे याला आणले. काही दिवसांनी तो पीडित महिलेला 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे' असे म्हणाला. त्याने तिच्यावर अत्याचार करत शिवीगाळ केली. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड हे अधिक तपास करीत आहेत.