वाळूतस्करांनी वाळूचा ट्रक जामखेड तहसील कार्यालयातून पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:18 IST2020-09-23T14:17:40+5:302020-09-23T14:18:18+5:30
जामखेड - प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी कर्जत रस्त्यावर वाळूसह भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर काही वेळाने ...

वाळूतस्करांनी वाळूचा ट्रक जामखेड तहसील कार्यालयातून पळवला
जामखेड - प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी कर्जत रस्त्यावर वाळूसह भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर काही वेळाने वाळूतस्करांनी तो ट्रक तहसील कार्यालयातून पळवला. या घटनेचा महसूल प्रशासनाने निषेध केला असून चार महिन्यांत दुसर्यांदा अशी घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे हे पोलीस पथकासोबत कारवाईसाठी बाहेर पडले होते. त्यांना कर्जत रस्त्यावर एक ट्रक वाळू घेऊन येताना दिसला सदर ट्रक थांबवून त्यांनी तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. ट्रक तहसील कार्यालयात आणून लावल्यानंतर काही वेळाने वाळूतस्करांनी गेट तोडून वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून पळवला.
याबाबत नायब तहसीलदार यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना सदर घटनेची माहिती दिली व वाळूतस्करावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.