जवानांना सलाम! लग्नमंडपामधून थेट निघाले रणांगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 04:40 IST2025-05-13T04:40:10+5:302025-05-13T04:40:54+5:30
ताबडतोब ड्युटीवर हजर व्हा, असा संदेश जवानास मिळाला.

जवानांना सलाम! लग्नमंडपामधून थेट निघाले रणांगणात
तुषार वांढेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : तालुक्यातील नारायणडोहो येथील जवान मनीष साठे याचे लग्न पार पडले. अंगाला हळद, हातावर मेहंदी असताना, त्याने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजेरी लावली. निरोप देताना साठे कुटुंबाची देशभक्ती गावाने अनुभवली.
नारायणडोहो येथील रावसाहेब मोहन साठे यांचा मुलगा मनीष हा दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झाला. सध्या तो ओडिशा येथे कार्यरत आहे. इमामपूर येथील अशोक रामदास मोकाटे यांची कन्या नमिता हिच्याशी मनीषचा विवाह ठरला. त्यामुळे मनीष यांनी लग्नासाठी काही दिवसांची रजा घेतली आणि ते गावी आले होते.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संदेश आला; हळदीच्या अंगाने जवान सीमेवर गेला
अशोक मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, करंजी (जि. अहिल्यानगर) : लग्न होऊन अवघे दोन दिवस उलटले नाहीत, तोच ड्युटीवर हजर होण्याचा संदेश आला. अर्धे अंग हळदीचे असतानाच कान्होबावाडी (करंजी, ता. पाथर्डी) येथील जवान भारत मातेच्या रक्षणासाठी सोमवारी पंजाबकडे रवाना झाला. त्याला निरोप देताना पत्नी, नातेवाईक भावुक झाले. कान्होबावाडी येथील महेश विठ्ठल लोहकरे हा लष्कराच्या मराठा फाइव्ह लाइट इन्फंट्रीमध्ये आहे.
लग्न होऊन अवघे दोनच दिवस झाले
महेश लोहकरे हे लग्नासाठी सुटीवर आले होते. त्यांचा स्वरूपा हिच्याशी शुक्रवारी (दि. ९) विवाह झाला. लग्न होऊन अवघे दोनच दिवस झाले. अंगाची हळददेखील फिटली नव्हती, तोच ताबडतोब ड्युटीवर हजर व्हा, असा संदेश जवानास मिळाला.