कोपरगाव तालुक्यात हातभट्टीच्या दारूची विक्री; एका महिलेसह पुरुषावर गुन्हा
By रोहित टेके | Updated: April 13, 2023 16:52 IST2023-04-13T16:51:40+5:302023-04-13T16:52:02+5:30
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुक्यात हातभट्टीच्या दारूची विक्री; एका महिलेसह पुरुषावर गुन्हा
कोपरगाव (जि. अहमदनगर ) : तालुक्यातील संवत्सर शिवारातील मनई वस्ती येथे हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) सकाळी १० वाजताच्या सुमारास वेगवेगळी कारवाई करत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत दोघांकडून ४५ हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जालींदर पुंजाजी तमनर यांनी मंदाबाई बळीराम आहेर व नानासाहेब कारभारी गायकवाड ( दोघे रा. मनाई वस्ती, कोपरगाव ) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.