बनावट ट्रॅक सुट, जॅकेट, पॅन्टची विक्री, तीन लाखांचा माल जप्त

By अण्णा नवथर | Updated: January 4, 2024 16:02 IST2024-01-04T16:01:58+5:302024-01-04T16:02:44+5:30

एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Sale of fake track suits jackets pants goods worth three lakhs seized in ahmednagar | बनावट ट्रॅक सुट, जॅकेट, पॅन्टची विक्री, तीन लाखांचा माल जप्त

बनावट ट्रॅक सुट, जॅकेट, पॅन्टची विक्री, तीन लाखांचा माल जप्त

अण्णा नवथर,अहमदनगर: कंपनीची कोणतीही परवानगी न घेता ट्रॅक सुट व पॅन्टची विक्री करताना एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी शाहरुख ईस्माईल शेख (वय २६, रा. मंगलगेट, नगर ) व सतिष अशोक सायंबर ( वय कायनेटिक चौक, नगर ) अशा दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील एका कंपनीचे बनावट शिक्के मारून टी, शर्ट, जॅकेट व पॅन्टची नगरमधील स्पोर्टस दुकानातून विक्री हाेत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व संंबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी नगरमधील दोन स्पोर्टस दुकानांवर छापे टाकले. त्यात या दोन्ही दुकानांत कंपनीच्या नावाने बनावट  शिक्के मारलेले ट्रॅक सुट, पॅन्ट आणि जॅकेटस मिळून आली. याबाबत वरील आरोपींकडून परवाना आहे का अशी विचारणा केली. मात्र त्यांच्याकडे याबाबत कुठलाही परवाना मिळून आला नाही. त्यामुळे दुकानातील बनावट ट्रॅक सुट, पॅन्ट, जॉकेट जप्त करण्यात आले असून, कॉपी राईट कायद्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरिक्षक तुषार धाकराव यांच्या पथकाने केली.

Web Title: Sale of fake track suits jackets pants goods worth three lakhs seized in ahmednagar