शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरी गर्दीने फुलली

By admin | Updated: December 24, 2015 23:36 IST

शिर्डी : नववर्षाची सुरूवात सार्इंच्या साक्षीने आनंददायी व्हावी, यासाठी संस्थान, महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़

शिर्डी : नाताळच्या सुट्ट्या व वर्षारंभाचे औचित्य साधून शिर्डीत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुखकर दर्शन व्हावे व भाविकांची नववर्षाची सुरूवात सार्इंच्या साक्षीने आनंददायी व्हावी, यासाठी संस्थान, महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़नववर्षाला होणारी संभाव्य उच्चांकी गर्दी लक्षात घेवून ३१ डिसेंबरला साई समाधी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा तसेच रात्री साईभजन संध्येचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे़ याशिवाय नाताळ व नववर्षाच्या काळात गर्दीनुसार व्हीआयपी पासेस सुरू ठेवायचे की बंद ? याबाबत परिस्थिती बघून निर्णय घेणार असल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितले़ गर्दी व्यवस्थापनासाठी २५, २६ व २७ डिसेंबर तसेच ३०, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या काळात दर्शनबारी व्यतिरिक्त प्रवेशासाठी क्रमांक तीनचे व बाहेर पडण्यासाठी चार व पाच क्रमांकाच्या महाद्वाराचा वापर करणार आहे़ कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या पदयात्रींच्या पालख्या वॉटर पार्क, गोरडीया हॉटेल समोरुन पिंपळवाडी रोडवर आणण्यात येणार आहेत़ ३१ जानेवारी रोजी रात्री दहा ते एक वाजे दरम्यान मंदिर परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी दर्शनानंतर रांग मंदिर परिसराच्या बाहेर काढण्यात येणार आहे़ आवश्यकतेनुसार लक्ष्मीमाता मंदिर ते नगर-मनमाड रोडपर्यंतचा पिंपळवाडी रोड व नगर-मनमाड ते संस्थान प्रसादालय हा शिवाचा रस्ता नो व्हेईकल झोन करणार आहे़ हे सर्व निर्णय व बदल गर्दीची परिस्थिती पाहून घेणार असल्याचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी स्पष्ट केले़नगर-मनमाड महामार्गावरील जड वाहतूक बाहेरून वळवण्यात आली आहे़ गुरुवारी पहाटेपासूनच लांबच लांब दर्शन रांगा लागल्या़ पश्चिमेकडील रांगा जुन्या प्रसादालयातून सुरू झाल्या तर पूर्वेकडील रांगा लक्ष्मी माता मंदिराच्या पुढे गेल्या होत्या़ मंदिर परिसरातही भाविकांची मोठी गर्दी होती़ गुरुवारी दुपारी व्हीआयपी पासेस तीननंतर काही काळ सुरू करण्यात आले होते़ दिल्ली येथील साईभक्त रजनी डंग यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची सजावट केली आहे़ भाविकांच्या सोयीसाठी नाशिक,शिंगणापूर,पुणे,मुंबई आदी ठिकाणी जादा बसेस सोडल्या आहेत़