साईदरबारी भाजपचा घंटानाद : ...अन्यथा टाळ, मृदुंग वाजवत ‘वर्षा’वर जावू; राधाकृष्ण विखे यांचा सरकारला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:51 IST2020-08-29T13:50:44+5:302020-08-29T13:51:36+5:30
साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. यानंतरही मुक्या, बहि-या सरकारला जाग आली नाहीतर टाळ, मृदुंग वाजवत वर्षा बंगल्यावर जावू, असा इशारा माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिला.

साईदरबारी भाजपचा घंटानाद : ...अन्यथा टाळ, मृदुंग वाजवत ‘वर्षा’वर जावू; राधाकृष्ण विखे यांचा सरकारला इशारा
शिर्डी : साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. यानंतरही मुक्या, बहि-या सरकारला जाग आली नाहीतर टाळ, मृदुंग वाजवत वर्षा बंगल्यावर जावू, असा इशारा माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिला.
सरकारला मंदिरे उघडण्यासाठी सद्बुद्धी द्यावी, यासाठी साईबाबांना साकडे घातले. मंदिरे उघडेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
माजीमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ़ सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली साईमंदिराच्या महाद्वारासमोर टाळ, मृदुंग, विणा वाजवत आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी गोंविंद शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
देश अनलॉक होत असतानामंदिरे मात्र लॉकडाऊनच आहेत. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मंदिरे उघडण्याची गरज आहे. दारुची दुकाने, मॉल सुरू केलेत. बदल्यांसाठी मंत्रालय उघडले जाते. पण जनतेची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे बंद असल्याची टीका आमदार विखे यांनी केली़