शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित महिलांचीही प्रसूती सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

--------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : गर्भवती महिलांना कोरोना झाल्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित १३ ...

---------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : गर्भवती महिलांना कोरोना झाल्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित १३ महिलांची प्रसूती झाली असून आई व बाळ दोन्ही सुखरूप व कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना झाल्याने गर्भपात करावा लागला, असे प्रकार जिल्ह्यात शून्यावर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोना किती घातक आणि जीवघेणा आहे, याची तीव्रता संपूर्ण जगाने अनुभवली आहे. आता तर कोरोना रूप बदलून मनुष्य जीविताला दिवसेंदिवस नवनवा धोका निर्माण करीत आहे. आबालवृद्धांच्या सुरक्षेची चिंता कायम ठेवणाऱ्या या विषाणूने जन्माआधीच कोवळ्या जीवांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या विषाणूने गर्भवती महिलांच्या प्रकृतीवर गंभीर आघात केला असून त्यांना विषाणूच्या संसर्गामुळे नैसर्गिक गर्भपात करावा लागल्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. सुदैवाने कोरोना झाल्यामुळे गर्भपात करण्याची वेळ एकाही महिलेवर आली नाही. उलट कोरोना झालेल्या महिलांच्या प्रसूती झाल्या असून महिला व बाळ दोन्ही सुखरूप झालेल्या आहेत, असे येथील महापालिकेतील वैद्यकीय तज्ज्ञ व जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञांनी सांगितले. कोरोनामुळे नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात मागील दीड वर्षांमध्ये खासगी रुग्णालयात एकूण नैसर्गिक गर्भपाताच्या प्रकरणांमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत कमी असल्याचे दिसून आले आहे. --------

मृत बाळांचा जन्माचेही प्रमाण कमीच

गेल्या दीड वर्षात मृत बाळांचा जन्म झाल्याच्या घटनाही अत्यंत कमी आहेत. यातील काही प्रकरणातही कोरोना विषाणू कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक गर्भपातासाठी प्रदूषण, तणाव, अयोग्य जीवनशैली, इन्फेक्शन आदी कारणे महत्त्वाची मानली जातात. पण कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांमध्ये गर्भपाताच्या घटना होतात. सुदैवाने नगर जिल्ह्यात असे प्रमाण अत्यंत कमी आहे.

-----------

गर्भवती महिलांना सावधगिरीचा सल्ला

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका आपल्या देशावरही ओढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी विशेष सावधगिरी बाळगायला हवी, असा सल्ला स्त्री रोग तज्ज्ञांकडून दिला जात आहे.