शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

साकुरला मजुराचा खून

By admin | Updated: May 18, 2014 00:14 IST

राहाता: दारू पिण्यासाठी ५० रूपये मागितले असता ते दिले नाही, याचा राग आल्याने बांधकाम मजुराच्या छाती व पोटावर वार करण्यात आले़ या हल्लयात मजूर गंभीर जखमी झाला़

राहाता: दारू पिण्यासाठी ५० रूपये मागितले असता ते दिले नाही, याचा राग आल्याने बांधकाम मजुराच्या छाती व पोटावर वार करण्यात आले़ या हल्लयात मजूर गंभीर जखमी झाला़ औषधोपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी दोघांविरूद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोनीसिंह पोहलाद यादव (वय २५, दमोह, मध्यप्रदेश) हा मजुर इतर साकुरी हद्दीत अनिल तात्यासाहेब तोरडमल यांच्या बांधकामावर काम करीत होता़ शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आरोपी अक्षय आप्पासाहेब दाभाडे (रा़ नांदुर्खी, ता़ राहाता) याने तिथे येवून मयत सोनीसिंह यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५० रूपये मागितले़ त्यास नकार दिल्याचा राग आल्याने आरोपी दाभाडे याने सोनिसिंह याच्या छातीवर, पोटावर चाकूने वार केले़ यामध्ये सोनिसिंह गंभीर जखमी झाला़ सदर घटना कुणाला सांगितली तर तुलाही जीवे मारीन असा दम आरोपी दाभाडे याने मयत सोनिसिंह याच्या जोडीदाराला दिला व तो पळून गेला. सोनिसिंह यास उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ मयताचा पुतण्या सुरताजसिंह फुलसिंह लोधी याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय दाभाडे याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी भेट दिली़ अधिक तपास पोलीस निरीक्षक राम सोमवंशी करीत आहेत़ (वार्ताहर)