शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांना चोपले

By admin | Updated: December 24, 2015 23:37 IST

श्रीरामपूर : काही दिवसांपूर्वीच दरोडेखोरांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न मालुंजा येथील गावकऱ्यांनी हाणून पाडल्यानंतर रविवारी मध्यरात्री पुन्हा दरोडेखोरांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

श्रीरामपूर : काही दिवसांपूर्वीच दरोडेखोरांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न मालुंजा येथील गावकऱ्यांनी हाणून पाडल्यानंतर रविवारी मध्यरात्री पुन्हा दरोडेखोरांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनी एकजूट व धाडस दाखवित पाठलाग करुन दरोडेखोरांना पकडून बेदम चोपून काढले.दोन दरोडेखोर गंभीर जखमी असून त्यांना औषधोपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिसरा दरोडेखोर गावठी कट्ट्यासह पळाला. राजू भानुदास शिरसाठ (वय ३०, रा. सातपूर, नाशिक, हल्ली रा. घोगरगाव) व नितीन विश्वास गायकवाड (वय ३०, करजगाव, ता. राहुरी) अशी ग्रामस्थांनी चोपलेल्या जखमी दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडे ४-५ सीमकार्ड, छोट्या गॅस टाकीसह एक गॅसकटर, वीज मोटार, एक बंदुकीची गोळी मिळाली. अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, सहायक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.रविवारी मध्यरात्रीनंतर मालुंजा सेवा संस्थेच्या इमारतीमधील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे कुलूप दरोडेखोर गॅस कटरच्या साह्याने तोडत होते. गॅस टाकीचा आवाज आल्याने काही तरुण व ग्रामस्थ जागे झाले. त्यांना पुन्हा दरोडेखोर गावात आल्याची चाहूल लागली. त्यांनी मोबाईलवरुन संपर्क साधून गावातील इतरांना जागे केले. लोकांनी टोळी टोळीने गावच्या चारही दिशांना नाकेबंद केली. दरोडेखोरांना गाव जागे झाल्याचे लक्षात येताच ते पळून जात असताना ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घेराव घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी गावकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ले परतवत गावकऱ्यांनी २ दरोडेखोरांना पकडून बेदम चोपून काढले. तिसरा दरोडेखोर पकडत असताना त्याने गावठी कट्ट्याचा धाक दाखविल्याने तो फरार होण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या दोघांना गावकऱ्यांनी बांधून ठेवले.पहाटे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना पाचारण करुन त्यांच्याकडे दोघा दरोडेखोरांना सोपविण्यात आले. फरार दरोडेखोरास पकडण्याचे आश्वासन अप्पर अधीक्षक जाधव व सहायक निरीक्षक परदेशी यांनी दिले. रविवारी मध्यरात्रीच्या या गुन्ह्याची सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरूच होते. (प्रतिनिधी)