शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

अहमदनगर : नुकतेच सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. हा ओबीसी घटकांवर झालेला फार मोठा ...

अहमदनगर : नुकतेच सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. हा ओबीसी घटकांवर झालेला फार मोठा अन्याय आहे. त्यामुळे हे आरक्षण तातडीने पूर्ववत मिळावे, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जुने बसस्थानक येथे निदर्शने करून रास्ता रोको करण्यात आला.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, राज्य प्रचारक नागेश गवळी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, प्रा. माणिक विधाते, अनिल बोरुडे, बाळासाहेब भुजबळ, संभाजी अनारसे आदी उपस्थित होते.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोग महाराष्ट्रात लागू केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक लढण्यासाठी ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळाले. मात्र, आता केंद्र सरकारने जनगणनेची माहिती सुप्रीम कोर्टाला न दिल्यामुळे ओबीसी आरक्षण स्थगित करण्यात आले. केंद्र सरकारने ही माहिती कोर्टाला दिली असती तर ओबीसी आरक्षण टिकले असते. ओबीसींचे शिक्षण, नोकरी, यातील आरक्षण जरी शिल्लक असले तरी राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. म्हणून केेंद्रामार्फत आरक्षण पूर्ववत करावे व मंडल आयोगाच्या उर्वरित शिफारसी राज्याला लागू कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात सचिन गुलदगड, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, अशोक तुपे, दीपक खेडकर, भरत गारुडकर, अनिल इवळे, बबनराव घुमटकर, प्रा. संजय गारुडकर, वसंत रांधवणे, अशोक कानडे, नानासाहेब गाडेकर, डॉ. सुदर्शन गोरे, बाळासाहेब गिरमे, परेश लोखंडे, सुषमा पडोळे, मंगल भुजबळ आदी उपस्थित होते.

---------

१८ ओबीसी आंदोलन

ओबीसी आरक्षण पूर्ववत मिळावे यासाठी निदर्शने करताना पांडुरंग अभंग, अंबादास गारुडकर, मच्छिंद्र गुलदगड, दत्ता जाधव, सुभाष लोंढे, प्रशांत शिंदे, नागेश गवळी, भगवान फुलसौंदर आदी.