खडी क्रेशर चालकांच्या संपामुळे रस्त्यांची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:19 IST2021-02-08T04:19:18+5:302021-02-08T04:19:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : लॉकडाऊननंतरच प्रथमच शहर व परिसरातील कामांना वेग आला होता. मात्र परिसरातील खडी क्रशर चालकांनी ...

खडी क्रेशर चालकांच्या संपामुळे रस्त्यांची कामे ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : लॉकडाऊननंतरच प्रथमच शहर व परिसरातील कामांना वेग आला होता. मात्र परिसरातील खडी क्रशर चालकांनी संप पुकारल्यामुळे शहरातील रस्त्यांची काम अर्धवट अवस्थेत असून, अनेक कामे ठप्प आहेत. त्यामुळे नागिरकांना खोदलेल्या रस्त्यांतून प्रवास करावा लागत आहे.
महसूल विभागाने नगर तालुक्यातील खडी क्रशर चालकांना वीज बिलांवर रॉयलटची अकारणी सुरू केली आहे. तालुक्यातहल ७१ क्रशर चालकांना १६५ कोटींच्या वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे क्रशर चालकांनी गेल्या पाच दिवसांपासून क्रशर बंद ठेवलेले आहेत. शहर व परिसरातील रस्ते, इमारत बांधकाम, कॉंक्रिटीकरण यासाठी लागणारी खडी क्रशरमधून मिळते. परंतु, हे क्रशरच बंद असल्याने शहराला होणारा खडीचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने ठेकेदारांचाही नाइलाज झाला आहे. खडी मिळत नसल्याने ठेकेदारांनी कामे बंद ठेवले आहेत. शहरातील दिल्लीगेट येथील रस्ता खोेदण्यात आला आहे. या रस्त्याव कॉंक्रिट केले जाणार आहे. परंतु, खडी उपलब्ध होत नसल्याने काम ठप्प असून, रस्ता खोदून ठेवल्याने अधिका-यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. क्रशर चालकांच्या संपावर तातडीने मार्ग काढावा, जेणेकरून रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी मागणी ठेकेदारांडून पुढे येत आहे.
...
- परिसरातील खडी क्रशर चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे खडी मिळत नाही. रस्ता खोदून ठेवला. कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करायचे होते. परंतु, क्रशर बंद असल्याने खडी मिळत नाही. त्यामुळे रस्त्याची कामे ठप्प आहे.
- राजेंद्र लोणकर, अध्यक्ष, महापालिका ठेकेदार असोसिएशन.
...