शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्याचा ठराव

By admin | Updated: September 4, 2015 00:12 IST

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण नगर जिल्ह्यात पोहचले आहे. अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण नगर जिल्ह्यात पोहचले आहे. अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासोबत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषदेने प्रत्येक २० हजार रुपयांप्रमाणे मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा विषय सभापती शरद नवले यांनी मांडला होता. गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. यात सभापती नवले यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेने काही तरी केले पाहिजे. यासाठी प्रत्येकी २० हजार रुपये मदतीचा ठराव यावेळी मांडण्यात आला. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात यावी, अशी चर्चा करण्यात आली. त्यावर समितीच्या अन्य सदस्यांनी कायदेशीर बाबी तपासून ही योजना सुरू करण्यास हरकत नसल्याचे मत नोंदवले. जिल्हा परिषद कृषी विभाग तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देवून त्यांना कृषी विभागाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे नवले यांनी सांगितले. राष्ट्रीय बायोगॅस योजनेतंर्गत सिलिंडरमुक्त गाव करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने हातात हात हात घालून काम करण्याच्या सूचना दिल्या. सभेला सदस्या पुनम भिंगारदिवे, उषा कराळे, उषा गोर्डे, पद्मा थोरात, पुष्पा रोहोम, मंगल निमसे, जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भारत राठोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)