शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

विविध प्रश्‍नांसाठी आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्त अनुसूचित जाती-जमाती, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्त अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.

राज्यात सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात विविध मागण्यांसाठी आक्रोश निवेदने देण्यात आली होती. राजेंद्र विधाते, संतोष कानडे, देवेंद्र बहिरम, सतीश जाधव, आण्णासाहेब गायकवाड, एन. एल. गायकवाड, भाऊसाहेब कदम, ऋषीकेश आंबेकर, एम. डी. भांगरे, वि. व. गिरी, आदी उपस्थित होते.

मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील रद्द केलेले ३३ टक्के आरक्षण पूर्ववत करावे, मागासवर्गीयांची पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्राॅसिटी व आरक्षण अधिनियम कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करावा, मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय मंत्र्यांची नियुक्ती करावी, देशातील कामगार विरोधी कायदे रद्द करावे, परदेशी शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट रद्द करावी, नोकरीतील साडेचार लाखांचे बॅकलॉग तत्काळ भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, अशा १६ विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे.

...................

२६ आरक्षण कृती समिती

आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी निदर्शने करताना राजेंद्र विधाते, संतोष कानडे, देवेंद्र बहिरम, सतीश जाधव, आण्णासाहेब गायकवाड, एन. एल. गायकवाड, भाऊसाहेब कदम, ऋषीकेश आंबेकर, एम. डी. भांगरे, वि. व. गिरी, आदी उपस्थित होते. (छायाचित्र : साजिद शेख)