शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

Maharashtra Election 2019 : दोन मंत्री अन् प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 05:57 IST

राम शिंदे-रोहित पवारांत चुरशीची लढत : पिचड-कांबळे यांना पक्षांतर तारणार का? जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचे, विखेंचे की थोरांताचे? Maharashtra Election 2019

अहमदनगर : जिल्ह्यात बहुतांश मतदारसंघात दुरंगी सामना रंगला आहे़ लोकसभा निवडणुकीत महायुतीने या जिल्ह्यावर कब्जा मिळविला़ विधानसभेला मात्र आघाडीने युतीसमोर आव्हान निर्माण केलेले दिसते. मंत्री राम शिंदे, पवारांचे नातू रोहित पवार, राष्टÑवादीतून पक्षांतर केलेले वैभव पिचड यांची प्रतिष्ठा जिल्ह्यात पणाला लागलेली आहे.

जिल्ह्यात गत विधानसभेला युती व आघाडी यांचे प्रत्येकी सहा आमदार विजयी झाले. यावेळी युतीकडून राधाकृष्ण विखे, त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे व पालकमंत्री राम शिंदे यांनी १२-० म्हणजे बाराही जागा युतीच्या निवडून आणू असा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजप व राष्टÑवादी प्रत्येकी आठ जागांवर, सेना चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढत आहे.

राष्टÑवादीने नेवासा मतदारसंघात उमेदवार न देता शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (संगमनेर) व भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे (शिर्डी) हे कट्टर विरोधक असल्याने ते एकमेकांच्या मतदारसंघात आव्हान निर्माण करतील असा अंदाज होता. मात्र, संगमनेर, शिर्डी या दोन्ही मतदारसंघात विरोधातील उमेदवार ऐनवेळी देण्यात आले. ते फारसे तुल्यबळ नाहीत.जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीकडून रोहित पवार हे निवडणूक लढवित आहेत़ शिंदे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणलेला आहे. मात्र, रोहित हे बारामतीची यंत्रणा घेऊन मतदारसंघात उतरले आहेत. ‘बारामतीचे पार्सल परत पाठवा’ हा भाजपने येथे प्रचाराचा मुद्दा केला आहे.

मी विकासासाठी या मतदारसंघात आलो आहे, असे उत्तर त्यावर रोहित पवार देत आहेत. राष्टÑवादीने यावेळी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात प्रताप ढाकणे यांच्या माध्यमातून वंजारी समाजाला उमेदवारीची संधी दिली आहे. तर भाजपने मोनिका राजळे व स्नेहलता कोल्हे या विद्यमान आमदारांच्या रुपाने दोन महिलांना पुन्हा संधी दिली आहे. वैभव पिचड व भाऊसाहेब कांबळे या दोन आमदारांनी पक्षांतर केले आहे. त्यांना मतदार कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१पवार हे नगर जिल्ह्याला कुकडी प्रकल्पातील हक्काचे पाणी मिळू देत नाहीत. नगर जिल्ह्याचा ते केवळ राजकारणासाठी वापर करुन घेतात हा मुद्दा सेना-भाजपकडून मांडला जात आहे.२बारामतीकर कोठे कोठे अतिक्रमण करणार? असा मुद्दा रोहित पवार यांच्या उमेदवारीबद्दल मांडला जात आहे.३शरद पवार यांना या वयात ईडीच्या नोटिसा पाठविल्या जातात. युती सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा मुद्दा आघाडीकडून प्रचारात मांडला जात आहे.४नगर जिल्ह्यातील शेती अडचणीत आहे. जिल्ह्याचे पाणी गोदावरीला जाते. युतीला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नाही. त्यांच्या सर्व योजना फसव्या आहेत, असाही प्रचार आघाडी करत आहे.
रंगतदार लढतीश्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांच्याशी आहे. येथे बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांनी आघाडी व युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांच्याशी आहे. येथे बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांनी आघाडी व युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.कोपरगाव मतदारसंघात स्नेहलता कोल्हे (भाजप) व आशुतोष काळे (राष्टÑवादी) हे पारंपरिक विरोधक आमनेसामने आहेत. मात्र, येथे राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे व भाजपचे विजय वहाडणे अपक्ष उमेदवारी करत आहेत.राष्टÑवादीने अकोल्यात वैभव पिचड यांच्या विरोधात डॉ. किरण लहामटे तर पारनेरला विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात निलेश लंके या नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरविले आहे. या दोन्ही मतदारसंघात चुरस दिसत आहे.नेवासा, नगर, राहुरी, शेवगाव या मतदारसंघांतही चुरशीच्या लढती आहेत.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील