शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कूळ वहिवाटीच्या जमिनी नियमित करण्याची कार्यवाही सुरू

By admin | Updated: June 17, 2016 23:37 IST

अहमदनगर : सरकारने कूळ कायद्यात सुधारणा केली असून, बाजार मूल्याच्या ५० टक्के रक्कम भरून कुळाच्या जमिनी नियमित करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली

अहमदनगर : सरकारने कूळ कायद्यात सुधारणा केली असून, बाजार मूल्याच्या ५० टक्के रक्कम भरून कुळाच्या जमिनी नियमित करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ तहसीलदारांकडून अशा जमिनींचा शोध घेऊन त्या नियमित करण्यात येणार आहेत़
शेत जमिनीची खरेदी- विक्री सध्या सहनिबंधक कार्यालयात होते़ जमिनीचे व्यवहार आॅनलाईन करण्यात आले आहेत़ मात्र, पूर्वी जमिनीची खरेदी- विक्री परस्पर गावच्या चावडीवर बसूनच केली जात असे़ त्याची कुठे नोंदच होत नव्हती़ कुळांच्या जमिनी कूळ नसणाऱ्या व्यक्तींनी खरेदी केल्या़ पण, ही जमीन सरकारजमा होईल, या भितीने अनेकांनी खरेदीची नोंद सरकारी कार्यालयात केली नाही़ सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता जमिनीचे परस्पर हस्तांतर झाले़ पण, ज्या व्यक्तीने जमीन खरेदी केली, त्याचे नाव सातबाऱ्यावर लागले नाही़ त्यामुळे जमीन मालकाला ही जमीन विकता येत नाही़ त्याचबरोबर त्याला बँकेकडून कर्जही मिळत नाही, यांसारख्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या़ त्याची दखल घेऊन सरकारने कुळाच्या जमिनी नियमित करण्याची एक संधी दिली असून, त्यासाठी कूळ कायद्यात सुधारणा केली आहे़ त्यानुसार नगर जिल्ह्यातील कूळ कायद्याने मिळालेल्या, पण सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता हस्तांतरीत झाल्या, अशा जमिनी रेडीरेकनरच्या ५० टक्के रक्कम भरून परत करण्यात येणार आहेत़ जिल्हा प्रशासनाने तसे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत़
जिल्ह्यात कुळाच्या जमिनींबाबतची अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत़ प्रांत अधिकारी सुनावणी घेऊन जमिनीच्या वादाचे निपटारे करतात़ कायद्यातील या सुधारणेमुळे कुळाच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार असून, कूळ हा शब्दच हद्दपार होणार आहे़ या जमिनी नियमानुकूल करण्यात येणार आहेत़ त्यामुळे कूळ कायद्याच्या जमिनींचे इतर जमिनींप्रमाणेच व्यवहार होतील़ त्याचबरोबर शेतकऱ्यांना जमिनींवर बँकांकडून कर्जही उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
(प्रतिनिधी)
कूळ कायदा ४३ शर्तीस असलेली जमिनीची सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता खरेदी केली असेल, असे व्यवहार नियमानुकूल करण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित तहसीलदारांकडे संपर्क साधावा़ तहसीलदारांना अशा जमिनींचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़
-भानुदास पालवे, अप्पर जिल्हाधिकारी, नगर.